Pages

14 Dec 2016

टाचना बाबत

दैनंदिन पाठटाचण (लेसन प्लॅन) काढण्याची शिक्षकांना सक्ती नको =========$========== अनिल बोरनारे यांची शिक्षण विभागाकडे मागणी  🔸मुंबई (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी व एबीएल  पद्धतीने अध्यापन करण्यासाठी शिक्षण विभाग शिक्षकांना प्रोत्साहित करीत असून शिक्षकही आपल्या अध्यापनात बदल करीत आहेत. सध्याची बदलती अध्यापनपद्धती पाहता शिक्षकांना दैनंदिन पाठटाचण (लेसनप्लॅन) काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे 🔹याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे शालेय शिक्षण सचिव, विद्या प्राधिकरणचे संचालक यांना पत्र लिहिले असून त्यात हि मागणी केली आहे  🔹राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना रोजचे पाठटाचण काढण्यासाठी वेळ द्यावा लागतो. सध्याची अध्यापनाची बदलती पद्धत पाहता रोजचे लेसनप्लॅन काढण्यात वेळ घालविण्यापेक्षा तोच वेळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी देता येईल. राज्यातील सर्व विद्यार्थी व शाळा प्रगत व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक वर्षांपासून प्राथमिक विभागासाठी तर पुढील शैक्षणिक वर्षात माध्यमिक विभागासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या जी आर नुसार प्रत्येक शाळेत ज्ञानरचनावाद व एबीएल (ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग) पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करायचे आहे यासाठी अध्यापनात बदल करून विविध शैक्षणिक वेबसाईटचा वापर अध्यापनात करायचा आहे त्यासाठी शिक्षण विभागाने तंत्रस्नेही शिक्षक ( टेक्नोसॅव्ही टीचर) तयार करण्याचे ठरविले असून सुमारे ३५ हजार शिक्षक तंत्रस्नेही शिक्षक तयार झाले आहेत तर अनेक शिक्षक तंत्रस्नेही प्रशिक्षण घेण्यास तयार आहेत.  🔸विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळांना प्रगत करणे आवश्यक असून त्यासाठी जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी दैनंदिन पाठटाचण काढण्यात रोजचा वेळ खर्ची करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळांना प्रगत करणे आवश्यक असून दैनंदिन पाठटाचणच्या कामाची सक्ती करण्यात येऊ नये असे आदेश शिक्षण विभागाने काढावे अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. 

1 comment: