मुंबईतील भिक्षेकरी मुलांसाठी ‘सिग्नल शाळा’ सुरु करण्याचा विषय विचाराधीन आहे. याबाबत ठाणे महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन असा उपक्रम मुंबईत राबविण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली
मुंबईतील काही विकलांग भिक्षेकरु मुलांना पळवून जमीनदारांना विकले जात असल्याबाबतचा प्रश्न सदस्य अमित साटम यांनी विधानसभेत विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुंबईतील काही विकलांग भिक्षेकरी मुलांना पळवून श्रीगोंदा येथील जमीनदारांना विकले जात असल्याबाबत लोणी व्यंकनाथ शिवारातील व शिरसगाव बोडखा (ता. श्रीगोंदा) येथील नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
त्याचबरोबर, या मुलांच्या शिक्षणासाठी शासन धोरण ठरविण्यासाठी सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्यात येऊन समिती नेमण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली.
मुंबई शहरातील भिक्षेकरी गृहाचा भूखंड विकासकाला दिल्याबद्दल तसेच ठाणे महानगरपालिकेने भिक्षेकरी मुलांसाठी पूलाखाली ट्राफिक सिग्नलजवळ शाळा सुरु केली आहे.
हा उपक्रम मुंबई शहरात राबविणार काय, याबाबतचा प्रश्न ॲड. आशिष शेलार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, याबाबतची माहिती घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या उपक्रमाची माहिती घेऊन त्याबाबतचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, ॲड. आशिष शेलार, मनीषा चौधरी आदींनी सहभाग घेतला.
Pages
- मुखपृष्ठ
- माझ्या विषयी
- E- पाठयपुस्तके
- पहिली ते सातवी कविता
- वार्षिक नियोजन
- कला,कार्या.शा.शि .अभ्यासक्रम
- "ज्ञानरचनावाद "
- रंगवण्यासाठीची चित्रे
- सा.स.मू.नोंदी
- My PDF
- 1 ली .ते ७ वीसाठी उपयुक्त PDF फाईल
- शाळा सिद्धी
- राष्ट्रगीत
- मराठी प्रतिज्ञा
- १ ते ३० पाढे mp3
- पसायदान
- A To Z इंग्रजी मुळाक्षरे आकर्षक स्वरुपात
- अल्फाबेट pdf मध्ये
- डिजिटल ज्ञानरचानावाद
- सांस्कृतिक महाराष्ट्र
- संगणक माहिती
- पर्यावरण मित्र
- विज्ञानातील छोटे प्रयोग
- घडयाळ वाचन इंग्रजीत pdf
- शैक्षणिक व्हिडीओ PPT
- एक्सेल सॉफ्त्टवेअर
- गोष्टी व्हिडीओ
- Apps बनविणे
- सेवापुस्ताकातील नोंदी
- We Learn English 1 to 5
- प्रजासत्ताक भाषणे
- PDF गोष्टी
- वाचनीय पुस्तके
- प्रकल्प यादी
- शासन आदेश
- प्रार्थना
- सरावासाठी flash card सर्व विषय
- मराठी डिक्शनरी
- संकलित तक्ते
- गणित online test सोडवा
- English बोलणे ,वाचणे,लिहिणे ,व्हिडीओ
- शैक्षणिक अँप्स (Anroid)
- प्रथम व व्दितीयसत्र प्रश्न पत्रिका
No comments:
Post a Comment