Pages

3 Jan 2017

शिक्षण क्रांती ज्योती

आधुनिक शिक्षित स्त्री चे मनोगत )


सावित्रीच्या लेकी आम्ही!

सावित्रीच्या लेकी आम्ही !


जिने पेटवली स्त्री शिक्षणाची ज्योती
सावित्रीच्या लेकी आम्ही!

जिने दिला आम्हा शिक्षणाचा अधिकार !
सावित्रीच्या लेकी आम्ही !
आमच्यासाठी तिने खाल्ला
शेणदगडाचा मार!
तिला दिली जोतिबाने साथ!
म्हणून केली तिने सर्वांवर मात!
सावित्रीच्या लेकी आम्ही!
चूल आणि मूल! तिच्या मुळे
बंद झाली रूढ!
सावित्रीच्या लेकी आम्ही!
तिच्या मुळे मिळत आहे!
मानाने जगण्याचा अधिकार!
वंदन माझे त्या मातेला!
किती स्मरावे तिचे उपकार!
सावित्रीच्या लेकी आम्ही!
सावित्रीच्या लेकी!

भारतातील प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांना त्यांच्या १८५ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन .
:

1 comment:

  1. Please send DA rates maharashtra 2013 to till now

    ReplyDelete