Pages

25 Dec 2016

Mdm

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *1006*
*दिनांक* : *23/12/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
🔷 *MDM पोर्टल मध्ये 30 नोव्हेंबर 2016 रोजीचा शिल्लक धान्य व धान्यादी माल नोंद करण्याबाबतचे whatsapp मॅन्युअल*🔷 __________________________________________


  ✏   या शैक्षणिक वर्षांपासून शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.हे पोर्टल सुरु झाले तेंव्हा सुरुवातीला सर्व शाळांना त्यामध्ये आपल्या शाळेत असलेला मागील शैक्षणिक वर्षांचा म्हणजेच दिनांक 1 जून 2016 चा शिल्लक धान्य व धान्यादी माल (शिल्लक साठा) नोंद करण्याची सूचना दिली गेली होती.सर्व शाळांनी या मध्ये नोंद देखील केलेली आहे.परंतु त्या वेळी काही शाळांची माहिती भरताना चूक देखील झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

✏  तसेच सर्व शाळा दररोज शालेय पोषण आहार लाभार्थी दैनंदिन माहिती म्हणजेच daily attendance भरत आहेत.हे भरत असताना काही शाळाकडून मागील काही दिवसांची माहिती भरावयाची राहून गेलेली आहे किंवा माहिती भरली परंतु चुकलेली आहे.

✏  अशा चुकांमुळे त्या शाळेच्या आपल्या पोषण आहार नोंद वही मध्ये असलेला सध्याचा शिल्लक साठा आणि MDM पोर्टल ला system कडून तयार ऑटो जनरेट झालेला शिल्लक साठा यामध्ये ताळमेळ बसत नाही म्हणजेच तफावत आढळून येत आहे असे लक्षात आले आहे.त्यामुळे आपल्याकडे नेमके किती धान्य शिल्लक आहे हे समजणे कठीण होत आहे.ही समस्या दूर करण्यासाठी सर्व शाळांनी आपल्या शाळांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी असलेला प्रत्यक्ष शिल्लक साठा (नोंद वहीमध्ये नोंद असलेला धान्य व धान्यादी माल) आपल्या शाळेच्या MDM पोर्टल ला नव्याने नोंद करावयाचा आहे. हे करत असताना आपल्या या वेळी कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काटेकोरपणे काळजी मुख्याध्यापकाने घ्यायची आहे.

✏  सदर माहिती अचूक भरल्यानंतर आपल्या शाळेतील शिल्लक मालाची प्रत्यक्ष स्थिती वरिष्ठ कार्यालयास समजून येणार आहे.यामुळे कोणत्या शाळेला धान्य व धान्यादी मालाची आवश्यकता आहे हे समजून येणार आहे.आजपर्यंत मुख्याध्यापक स्वतः धान्य व धान्यादी मालाची मागणी देत होते ते या प्रक्रियेनंतर संपुष्टात येणार आहे.
    तसेच आपल्या शाळेची धान्य मागणी ही system द्वारे जनरेट केली जाऊन पुरवठादारास कळवली जाणार आहे.यामुळे पोषण आहार शाळेस वेळेत पोहचण्यासाठी होणारा विलंब यापुढे होणार नाही हे लक्षात घ्यावे.

✏   तसेच पुढील शैक्षणिक वर्षात शाळेत रोजच्या रोज घेतली जाणारी नोंदवही मधील नोंद देखील बंद करण्यात येण्याच्या दृष्टीने ही माहिती काळजीपूर्वक भरणे महत्वाचे ठरणार आहे.
__________________________________________
🔴   *MDM पोर्टल मध्ये 30 नोव्हेंबर 2016 रोजीचा शिल्लक धान्य व धान्यादी माल कसा नोंदवावा याबाबत आता सविस्तर माहिती पाहू.* 🔴 __________________________________________

 ➡ *सर्वप्रथम मुख्याध्यापकाने education.maharashtra.gov.in या website वर जाऊन आपले MDM पोर्टल ला संगणकावर (mobile वर नव्हे ) शाळा login करावे.*                      


➡ *MDM पोर्टल मध्ये login केल्यावर दिसून येत असलेल्या MDM Daily Attendance या tab ला क्लिक करावे.*

➡ *MDM Daily Attendance या tab ला क्लिक करून आपण दररोजच्या उपस्थितीत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या नोंद करण्याचे काम करत असतो.परंतु यावेळी मात्र आपणास त्या संदर्भातील नेहमीचे page न दिसता तेथे कॅलेंडर असलेली एक नवीन स्क्रीन दिसून येईल.*

➡ *ही स्क्रीन नोव्हेंबर २०१६ या महिन्याची स्क्रीन आहे.या स्क्रीन मध्ये आपणास इतर कोठेही क्लिक न करता फक्त खालच्या बाजूला असलेल्या Approve Closing Balance या बटनावर क्लिक करावयाचे आहे हे लक्षात घ्या.त्यानंतर आपणास  नोव्हेंबर २०१६ या महिन्याची  Closing Balance ची एक स्क्रीन open झालेली दिसेल.*

➡ *नोव्हेंबर २०१६ या महिन्याच्या  Closing Balance स्क्रीन मध्ये आपणास   Closing Balance (1 To 5) आणि Closing Balance (6 To 8 ) अशा दोन वेगवेगळ्या कॉलम मध्ये माहिती स्क्रीन वर दिसेल.निरीक्षण केले असता असे लक्षात येईल की,हा Closing Balance आणि आपल्या शाळेच्या नोंद वहीमध्ये असलेला नोव्हेंबर महिन्याचा Closing Balance हा जुळत नाही.याचे कारण असे आहे की,स्क्रीन वर म्हणजेच MDM पोर्टल ला असलेला Closing Balance तयार करताना संपूर्ण राज्यासाठी धान्य व धन्यादी मालाचे वापरावयाचे प्रत्येक विद्यार्थ्यामागील प्रमाण हे एकसारखे घेतलेले आहे.प्रत्यक्षात मात्र प्रत्येक जिल्ह्यातील हे प्रमाण हे वेगवेगळे आहे हे आपणास माहती आहे,परंतु MDM पोर्टल मध्ये मात्र संपूर्ण राज्यासाठी एकच प्रमाण गृहीत धरून सदर Closing Balance आपणास दाखवण्यात आलेला आहे.सदर Closing Balance आणि आपल्या नोंद वहीत असलेला प्रत्यक्ष Closing Balance हा सारखा असणे आवश्यक आहे.याकारीती MDM पोर्टल मध्ये आपणास दिसत असलेल्या वरील स्क्रीन मधील Closing Balance यात दुरुस्थी होणे गरजेचे आहे.ही दुरुस्थी करण्यासाठी नोंद वहीत असलेली प्रत्यक्ष माहिती खात्री करून  वरील फॉर्म मध्ये आपणास update/दुरुस्थ करावयाची आहे.म्हणजेच आपल्या नोंद वहीत असलेला दिनांक  ३० नोव्हेंबर २०१६ रोजीचा Closing Balance आणि MDM पोर्टल ला असलेला दिनांक  ३० नोव्हेंबर २०१६ रोजीचा Closing Balance हा एकसारखा येईल अशी दूरूस्थी करावयाची आहे.हे करत असताना आपल्या नोंद वही मधील दिनांक  ३० नोव्हेंबर २०१६ रोजीचा Closing Balance हा अंतिम समजण्यात यावा आणि त्या दृष्टीने MDM पोर्टल मधील दिनांक  ३० नोव्हेंबर २०१६ रोजीचा Closing Balance मध्ये योग्य तो बदल करावा. सदर माहिती ही दिनांक 31 डिसेंबर २०१६ रोजीपर्यंत आपणास भरता येईल.सर्व माहिती भरून झाल्यावर स्क्रीन मध्ये दाखवल्याप्रमाणे approve या tab ला क्लिक करावे.*

➡    *अशा रितीने सर्व शाळांनी आपला नोव्हेंबर २०१६ या महिन्याचा Closing Balance हा update करून घ्यावा. एकदा Closing Balance भरून/update केल्यावर पुन्हा त्यामध्ये दुरुस्थीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार नाही.त्यामुळे माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी आणि त्यानंतरच Approve या बटनावर क्लिक करावे.*

 ➡   *अशा प्रकारे Closing Balance भरणे ही प्रक्रिया फक्त याच महिन्यासाठी करावयाची आहे.यापुढे प्रत्येक जिल्ह्याच्या दर विद्यार्थ्यामागे धान्य आणि धान्यादी मालाचे वापरावयाचे प्रमाण हे निश्चित करण्यात येणार आहे.म्हणजेच डिसेंबर २०१६ या महिन्याचा Closing Balance आपणास डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी Stock Balance Report या बटनाला क्लिक करून पहावयास मिळेल.या बटनाला क्लिक करून दिसणारा Closing Balance आणी Current balance हा आपल्या नोंद वहीशी जुळत असलेला आपणास दिसून येणार आहे.*

   अशा प्रकारे सर्व शाळांनी नोहेंबर २०१६ या महिन्याचा Closing Balance नोंद करण्याची ही प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण करावयाची आहे.दिनांक ३१/१२/२०१६ नंतर ही सुविधा कोणत्याही शाळेसाठी उपलब्ध नसेल.म्हणजेच दिनांक ३१/१२/२०१६ ही माहिती भरण्याची/update करण्याची अंतीम मुदत आहे हे लक्षात घ्यावे.अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.तेथे आपणास अधिक सविस्तर माहिती मिळेल.

*ही माहिती MDM पोर्टल मध्ये कशी भरायची याबाबत चे चित्रयुक्त मॅन्युअल आज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे,ते वाचण्यासाठी/Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

*मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठीची लिंक :*

https://goo.gl/vQwXoq

याबाबत अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

No comments:

Post a Comment