अवघ्या ५०० लोकवस्ती असलेल्या गावात काम करताना आणि या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची मानसिक तयारी ठेवून शाळा स्मार्ट डिजीटल करण्याबाबत मनात असणारी तीव्र ईच्छा आज प्रत्यक्षात उतरवली आणि डिजीटल शाळेचे स्वप्न पूर्ण झाले.एवढ्या छोट्याशा गावात तब्बल दोन ते अडीच लाख रुपये शैक्षणिक उठाव केला व स्वप्नातली शाळा केली.यातून नक्कीच आदर्श वत पिढी निर्माण करु . 25 रु पासून देणगी स्विकारली आणि २6 जानेवारीच्या स्नेहसंम्मेलनात आमचे काम पाहून दानशूर व्यक्तीनी 2५चे २५०००/- कधी झाले हे कळू दिले नाही.सलाम त्या गावकरी व दानशुर व्यक्तीना शेवटी एवढेच की आपले काम हाच गावाचा विश्वास असतो.तो मिळवणे गरजेचे असते.
आपलाच मीञ - किशोर चव्हाण .
kupach chhan mitra abhiman aahe tuza
ReplyDelete